Shivaji, Raja Shivaji-1, Marathi 5083
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
झनक झनक झन् मंगल वाजे, वीणेची झनकार.
छम् छम् घुंगरूँचा रव ताल, ग! वाजे वीणेची झनकार.
1
आज शिवाजी राजा झाला, उत्सव हा रंगदार, ग बाई!
फूल मोगरा चाफा उधळूं, घालूँ गुलाब हार ग!
गाऊँ त्याचा जय जयकार, ग! वाजे वीणेची झनकार.
2
गीत लावण्या अन् पोवाडे, वाजत डफ दमदार, ग बाई!
ललना गाती सुंदर गीतें, ताल जयां रसदार, ग!
कवि शाहिर गातीं दणकट, छत्रपति जयकार,
ग! वीणेची झनकार.