Shivaji, Escape from Agra-1, Marathi 4941
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Marathi]
आला ग बाई! राजा शिवाजी, घरी आला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.
1
सांगे जिजाऊ माता, शिवबा शहाणा. देऊ ग आशिष त्याला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.
2
लपून-छपून कसा, तिथून निघाला. देऊन त्रास जिवाला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.
3
देऊन तुरी ग बाई! मुगलांच्या हातीं. बसून पेटारीं निघाला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.
4
सुलतान त्याच्या मागे, शोधत आला. सुगाव न काहींच त्याला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.
5
अंबा भवानीचा, वरदान त्याला. ओवाळूं ग आरती त्याला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.
6
अवतार तो शुभ, शिव शंकराचा. मानाचा मुजरा ग! त्याला.
आला ग बाई! राजा शिवाजी घरी आला.