Shivaji, Kondhana Victory, Marathi 4973
Hindustani, Reed Organ, Tabla,Fast
00:00 / 00:00
Lyrics
[Marathi]
जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें.
मंगल मुंदरी, मुकुन्द माळा, काळीं घनदाट कुन्तलें.

1
घण घण करिती घंटा घुंगरू, सैनिक नाचात रंगले.
कौढाण्यावर जय शिवबाच्या, शाहिर गाण्यांत दंगले.
जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें.
मंगल मुंदरी, मुकुन्द माळा, काळीं घनदाट कुन्तलें.
2
पुष्प उधळतीं सुंदर ललना, योद्धे युद्धात जिंकले.
शिंपडतीं जल पावन ऋषि मुनि, घेउनी हातीं कमंडलें.
जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें.
मंगल मुंदरी, मुकुन्द माळा, काळीं घनदाट कुन्तलें.
3
विजयी झाले वीर मावळे, मुगलांचे राज्य संपले.
भारतमाते! तुझ्या मुलांनी, स्वप्न स्वराज्याचे गुंफले.