Shiv Aaradhana

Shiv Aaradhana

Classic

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

विषय — शिव आराधना (भजनरूप) धृवपद : भोलेनाथ शिव शंकरा, हर हर महादेव हृदयामध्ये वस तू माझ्या, हर हर महादेव ॥धृ॥ १ सत्यम् शिवम् सुंदर रूप तुझे भक्तीभावे गातो नाव सोमेश्वर तू करुणासागर मनी तुझाच ठाव ॥१॥ २ शंकर-पार्वती विश्वसुंदरी दिव्य तुझा परिवार कार्तिकेय श्री गणेशा करती तुझा सत्कार ॥२॥ ३ बेल पुष्प जल अर्पूनी करितो अभिषेक सदाशिवा सुखी ठेव सर्वांना दूर कर दुःख-भेक ॥३॥ ४ देवांचा देव शंभो देवा तुला माझे वंदन विश्वकल्याणकरी तूच दे ज्ञानपूर्ण चिंतन ॥४॥ संगीता महाजन जळगाव