Shivaji, Wise King Shivaji, Marathi 5351
Hindustani, Reed Organ, Tabla, Slow
00:00 / 00:00
Lyrics
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.
1
पुत्र शहाजींचा, बाळ जिजाऊँचा.
नृप मराठ्यांचा, शिवाजी तो.
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.
2
जीव मावळ्यांचा, कोणी नाही ज्यांचा.
प्रिय सखा त्यांचा, शिवाजी तो.
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.
3
बघोनी अशांति, केली ज्याने क्रांति.
दया क्षमा शांति, शिवाजी तो.
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.
4
तान्हा बाजी ज्याचे, वीर संगी साचे.
पुढे सिद्धि नाचे, शिवाजी तो.
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.
5
सदाचार राशी, सदा ज्याचे पाशी.
शिष्य रामदासी, शिवाजी तो.
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.
6
तुकोबाने ज्याला, दिली रुद्रमाला.
धन्य धन्य झाला, शिवाजी तो.
जाणता जो राजा, रक्षितो समाजा.
मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.