Shivaji, Raigadh Victory-1, Marathi 5051
Hindustani, Reed Organ, Tabla,
00:00 / 00:00
Lyrics
नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!
नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!
1
वीट रचा, नीट रचा, धीट रचा, छान, रे!
कोट उभा तुंग करूँ, त्वरें करा काम, रे!
नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!
2
शत्रु घातकी महा, मातृभूमि संकटे.
देश रक्षणाय करा, दुर्ग हा महान, रे!
नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!
3
छत्रपतीने दिले, काम मुल्यवान, रे!
भूल मुळी नसो कुठे, असो सदा ध्यान, रे!
नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!
4
राष्ट्रहितें त्याग करी, वीर अर्पण प्राण, रे!
पुण्यवान क्षात्र तोच, स्वर्ग त्यास धाम, रे!
नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!