Shivaji, Shiva Leelamrit-2, Marathi 5231
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
ऐका सुंदर संगीत सागर, शिवलीलांच्या कथांचा आगर.

1
देवी भवानीने वर दिधला, परम-सुताचा जिजाबाईला.
जन्म शिवाचा शिवनेरीवर, नर-रूपें अवतरला शंकर.
ऐका सुंदर संगीत सागर, शिवलीलांच्या कथांचा आगर.
2
मातेने पढवुनि पुत्राला, स्वातंत्र्याचा पाया रचला.
कर्म शिवाजीं चे अजरामर, इतिहासें जे पहिला नंबर.
ऐका सुंदर संगीत सागर, शिवलीलांच्या कथांचा आगर.
3
विजय-तोरणा प्रमाण पहिले, गड सर केले, अनेक रचले.
रोमांचक जय सिंहगडावर, हर्षित झाले भवानी-शंकर.
ऐका सुंदर संगीत सागर, शिवलीलांच्या कथांचा आगर.
4
नामांकित अरि सर्व नमविले, दिल्लीपतिला छान चकविले.
सुलातानांना केले जर्जर, गनिमी-काव्यांचे ते संगर.
ऐका सुंदर संगीत सागर, शिवलीलांच्या कथांचा आगर.
5
पर-नारी माते सम आदर, भूप शिवाजी सद्गुण आगर.
ऐकुनि दिव्य कथांचा सागर, गदगद झाले धरती अंबर.