Shivaji, Righteous King Shivaji, Marathi 5201
Hindustani, Reed Organ, Tabla, Fast
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग!
असा जाणता, तथा शहाणा, महान राजा, न अन्य ग!

1
परस्त्री ज्याला, सुवंद्य माता, तुझा शिवाजी सुगण्य ग!
परम धुरंधर तुझा पुत्र हा, जिजाऊ माते तू धन्य ग!
स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग!
असा जाणता, तथा शहाणा, महान राजा, न अन्य ग!
स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग!
अंरात-2
अगम्य लीला, अनेक ज्याच्या, चरित्र त्याचे, सुरम्य ग!
स्वदेश ज्याने स्वतंत्र केला, तया भवानी प्रसन्न ग!