Shivaji, Shiva Leelamrit-3, Marathi 5211
Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast
00:00 / 00:00
Lyrics
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!
शिवरायाची ऐकुनी गाणीं, झाली रयत शहाणी, रे!
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!
1
दिली शिवजीला माते ने, स्वातंत्र्या ची किल्ली, रे!
वीर मराठ्यां ची मग सेना, शिवबा ने ती केली, रे!
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!
2
लागोपाठ सर किल्ले केले, नवीन रचले भारी, रे!
जगात विश्रुत ते गड त्याचे, चढतां येई ग्लानि, रे!
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!
3
अफजुल, सिद्दी, शाहिस्ते खाँ, हार मानले वैरी, रे!
शत्रुदलांवर गनिमी हल्ले, सूरत वर ही स्वारी, रे!
4
किल्लों-किल्लीं फिरतो चंचल, पकडूँ शके न, कोणीं रे!
अद्भुत सुटका आगर्या वरुनी, लीला अनुपम, दैवी रे!
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!
5
सदाचार हा ज्याचा बाणा, परस्त्री माता मानी, रे.
असा जाणता राजा जगती, कोण भला नृप दानी, रे.
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!
6
कथा ऐकाता, नयनीं येई, आनंदाश्रु पाणी, रे !
भारत देशा! लेकरें तुझीं, प्रताप झाशी-राणी, रे!
शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!