Shivaji, Shivaji’s Birth-2, Marathi 5311
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
यदा यदा हि धर्मस्य हानिर्भवति सज्जनाः.
अभ्युत्थानमधर्मस्य पृथिव्यां जायते शिवः.
[Intro]
गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.
मुख-मंडल त्याचे दमदार, काम सुमंगल तो करणार.
गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.
1
सुंदर त्याचा रंग सांवळा, जैसा शिव-शंकर तो नीळा.
लोचन त्याचे मोहक फार, त्याचे अंगीं गुण बेसुमार.
गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.
2
होईल मोठा वीर मराठा, वर ऐसा दे, पंढरीनाथा!
स्वप्न करोनी तो साकार, राज्य हिंदवी हे करणार.
गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.
3
हस्तीं त्याच्या रेखा मंगल, भाग्य ललाटीं त्याचे उज्ज्वळ.
योजुनि शूर गुणीं सरदार, होइल त्याचे शुभ सरकार.
गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.
4
सद्गुण हा ची त्याचा ठेवा, वर ऐसा तू दे गा, देवा!
अश्व सवारी तो करणार, रण जिंके त्याची तलवार.
गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.