जेव्हा तुला मी पाहिले..
Country, Romantic, Uplifting, Emotional,Male Voice,Medium
00:00 / 00:00
Lyrics
अलभ्य्य ती भेट आपली
अजुनी मनास सुखाविते,
लाजली होतीस तू किती
जेव्हा तुला मी पाहिले..
तुझे मनमोहक ते लाजणे
अजुनी नजरेसमोर येते,
पाहताच मनास भावले
अद्भुत सुंदर रूप तुझे..
जणु स्वप्नातीलच भेट ती
दोन जीवांना खुलविणारी,
सुंदर अशा त्या भेटीस
उपमा मी देऊ कशाची?
क्षणभर तो खेळ नजरेचा
प्रेमाचे अंकुर फुलविणारा,
हळुवार हृदयात शिरूनी
प्रेमाला रंगत आणणारा..
क्षणात जुळले नाते आपले
जन्मो जन्मी बांधले गेले,
जीवनातील रंग उजळले
जेव्हा तुला मी पाहिले..