Shivaji, Rani Saibai, Marathi 5191
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
बाळपणी ती जुळली नाती, नवी संपदा आली हाती.
जन्मोजन्मी माझी होती, ह्या जन्मीही इथे पुन्हा ती.
ह्याला नशीब म्हणती. ह्याला नशीब म्हणती.
ह्याला नशीब म्हणती.
1
दैवाची ही किमया भारी, तीच घडविते माया सारी.
फलदायी ती व सुखकारी, चैतन्याला उजळविणारी.
देवा पुढची पणती. ह्याला नशीब म्हणती.
ह्याला नशीब म्हणती.
2
मंद ज्योत ती स्वतः जळते, मंगळ आभा ती झळझळते.
दर्शन प्रभुचे ज्याने फळते, ती प्रियदर्शिनी हे मग कळते.
भाग्यलक्ष्मी कण-कण ती. ह्याला नशीब म्हणती.
3
ती राधा ती सीता गौरी, ती मीता ती सजणी नौरी.
सौभाग्यवती ती अर्धांगिनी, ऋद्धि-सिद्धि डुलवित चौरी.
स्तुति-स्तोत्र गुणगुणती. ह्याला नशीब म्हणती.
ह्याला नशीब म्हणती.