Shivaji, Shivaji the Great, Marathi 5281
Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला.
अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला.
जसा शिवाजी महान राजा, तसा कुणीं या जगी न झाला.
बहुत आले नि नष्ट झाले, कधी कर्मयोगी असा ना मिळाला.
शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला.
1
कुणीं क्रूर शठ अत्याचारी, नास्तिक दंभी कुणीं पुढारी.
कुणीं लालची लंपट भारी, नारी पूजा न गंध ज्याला.
शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला.
अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला.
2
मातृभूमिसी न प्रीति ज्याला, सत्ताधारण धोरण ज्याला.
कुणीं कृपण, कुणीं लोभी झाला, मोह-वासना अनंत ज्याला.
शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला.
अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला.
3
कुणीं तोडतो मंदिर मूर्ति, “धर्म-अंधळा” कुणास कीर्ति.
स्वार्थ्य-हिताची जयास स्फूर्ति, सर्व-हिताची न खंत त्याला.