Shivaji, Shivaji’s Birth-2, Marathi 5311

Shivaji, Shivaji’s Birth-2, Marathi 5311

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

यदा यदा हि धर्मस्य हानिर्भवति सज्जनाः. अभ्युत्थानमधर्मस्य पृथिव्यां जायते शिवः. [Intro] गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार. मुख-मंडल त्याचे दमदार, काम सुमंगल तो करणार. गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार. 1 सुंदर त्याचा रंग सांवळा, जैसा शिव-शंकर तो नीळा. लोचन त्याचे मोहक फार, त्याचे अंगीं गुण बेसुमार. गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार. 2 होईल मोठा वीर मराठा, वर ऐसा दे, पंढरीनाथा! स्वप्न करोनी तो साकार, राज्य हिंदवी हे करणार. गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार. 3 हस्तीं त्याच्या रेखा मंगल, भाग्य ललाटीं त्याचे उज्ज्वळ. योजुनि शूर गुणीं सरदार, होइल त्याचे शुभ सरकार. गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार. 4 सद्गुण हा ची त्याचा ठेवा, वर ऐसा तू दे गा, देवा! अश्व सवारी तो करणार, रण जिंके त्याची तलवार. गडे! आला जन्मी राज कुमार, भासे जैसा शिव-अवतार.