Shivaji, Rani Jijabai-2, Marathi 5182
Hindustani, Reed Organ, Tabla, ,Slow
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
माता म्हणा, म्हणा आई, मैया म्हणा, तिला माई.
अंबा म्हणा, म्हणा अम्मा, जननी म्हणा, ती पुण्याई.
1
केला पुत्र तिने राजा, गाउनी मंगल अंगाई.
माता पूज्य मराठ्यांची, देवी तीच जिजाबाई.
माता म्हणा, म्हणा आई, मैया म्हणा, तिला माई.
अंबा म्हणा, म्हणा अम्मा, जननी म्हणा, ती पुण्याई.
2
अगम अगाध तिची माया, प्रेमळ सदा सुखी छाया.
जननी कुणास ती आजी, पत्नी सुता सखी ताई.
माता म्हणा, म्हणा आई, मैया म्हणा, तिला माई.
अंबा म्हणा, म्हणा अम्मा, जननी म्हणा, ती पुण्याई.
3
गौरी कौसल्या सीता, यशोमती भारतमाता.
झाशीची राणी लक्ष्मी, धन्य धन्य पन्नादाई.