Shivaji, Shivaji Chaupai, Marathi 5271

Shivaji, Shivaji Chaupai, Marathi 5271

Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

हानिं कुर्वन्ति धर्मस्य पापाचारा यदा यदा. दुष्कृतानां विनाशाय हरः सृजति वै तदा. शिव अवतरले कलियुगे, पुत्र-जिजाऊ स्वरूप. नष्ट कराया भ्रष्टता, रूप मराठा भूप. [Intro] मंगल शुभ मुखमंडल ज्याचे, नाम सुमंगल शिवबा त्याचे. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम्. 1 सत् आचरणी, अद्भुत नृप जो, विश्रुत धर्मी तीन-जगीं तो. झाला जगती कुठे न ऐसा, भूप महात्मा, शिवबा जैसा. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम् 2 वीर बहादुर तो रणजेता, स्वातंत्र्याचा धीट प्रणेता. त्याने शत्रु अधम वध केले, बहुत अपेशी वापस गेले. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम् 3 अचाट किल्ले रचले ज्याने, अनेक गड सर केले त्याने. किल्लो-किल्ली चंचल फिरतो, म्हणतीं, पहाडी जणूँ उंदीर तो. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम् 4 एक अनेकांशीं तो लढतो, गनिमी-कावे करुनी बढतो. अश्वरोह कुशल लढवय्या, रण मैदान तयाची शय्या. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम् 5 जिरें-टोप तो मनांत ठसतो, रुतबा ज्याचा चित्तीं बसतो. स्थापन केले राज्य-हिंदवी, दैवत द्यावी तयास पदवी. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम् 6 धन्य! धन्य! तू जिजामाता! अमर करो तो तुला विधाता. वाह! वाह! तू भारत माते! जिजा-शिवाचे केले नाते. शिव ओम् जय ओम् जय जय शिव ओम्. जय ओम् शिव ओम्, जय जय जय ओम् शिवबा तू शाबास रे! दान तुझे अति खास. तुझ्या विना अपुरा, गडे! भारतीय इतिहास.