Bharat Rashtra Geet, Marathi 6343f
Hindustani, Sitar, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
भारतं सुंदरं स्वर्णभूमि, आम्हां सर्वांची ही सर्गभूमि.
कर्मवीरांची ही कर्मभूमि, हिला शतवार वन्दे नमामि.
1
राष्ट्र हे कीर्ति सम्पन्न भारी, टोप ह्याचा महत्तम हिमाद्रि.
शीत सरितांचे पावन पाणी, पूज्य संतांची ही पुण्यभूमि.
2
देवभूमि ही परमातम्याची, दिव्य शांति इथे आतम्याची,
“वसुधैव कुटुंब” म्हणाला, देश अग्रेसर हा, जगाला,
3
ह्याची आभा ही आकाश ज्योति, चंद्र सूर्य हे डूलांचे मोती,
रम्य अनुपम अशी ह्याची ख्याति, विश्व उज्जवळ या देशाची कीर्ति.
4
इथे वायूत सौरभ सुगंधी, इथे आकाशपाताळ संधि.
चंद्रसूर्याची कुडलें कानीं, पृथ्वीच्या पाठी ही स्वर्गभूमि.
5
मृग शार्दूल गज उंट प्राणी, मोर कोकीळ मिट्ठूची गाणीं.
हर्ष सौंदर्य श्रावण मासीं, अशी भूमि निसर्गाची राणी.
6
पर दारा इथे वन्द्य माता, पर दादा इथे बंधु तात्या.
सभ्यता नम्रता सर्व अंगी, सौख्य शांति अहिंसा ईमानी.
7
नर नारी इथे वीर ज्ञानी, भक्त योगी कलाकार दानी.
स्नेह सेवा इथे खानदानी, दिव्य तत्त्वांची ही हिंदुभूमि.
माते जय जय तुझी तन मनानी,
मुलें मंगल तुझी सर्व आम्हीं.
जय हो जय हो, तुझी जय हो जय हो,
जय हो जय हो, सदा जय हो जय हो.