Shivaji, Wise King Shivaji, Marathi 5351

Shivaji, Wise King Shivaji, Marathi 5351

Hindustani, Reed Organ, Tabla, Slow

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो. 1 पुत्र शहाजींचा, बाळ जिजाऊँचा. नृप मराठ्यांचा, शिवाजी तो. जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो. 2 जीव मावळ्यांचा, कोणी नाही ज्यांचा. प्रिय सखा त्यांचा, शिवाजी तो. जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो. 3 बघोनी अशांति, केली ज्याने क्रांति. दया क्षमा शांति, शिवाजी तो. जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो. 4 तान्हा बाजी ज्याचे, वीर संगी साचे. पुढे सिद्धि नाचे, शिवाजी तो. जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो. 5 सदाचार राशी, सदा ज्याचे पाशी. शिष्य रामदासी, शिवाजी तो. जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो. 6 तुकोबाने ज्याला, दिली रुद्रमाला. धन्य धन्य झाला, शिवाजी तो. जाणता जो राजा, रक्षितो समाजा. मालोजी ज्याचा आजा, शिवाजी तो.