पहाडावरच्या नर्गिसने आज  पुन्हा यावे उमलून

पहाडावरच्या नर्गिसने आज  पुन्हा यावे उमलून

Pop

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

पहाडावरच्या नर्गिसने आज  पुन्हा यावे उमलून सुगंध नशीला तिचा घ्यावा कड्या - कपारीतून रानांमधल्या रानफुलांनी जरा- जरासे मोहरुन जावे आयुष्याच्या संध्याकाळी तू नव्याने जन्मास यावे तू शतायुषी व्हावे, तू शतायुषी व्हावे........... गंध कस्तुरी रानामध्ये अलवार दरवळतो जीवनातल्या सुंदर क्षणांची एक रूबाई गातो राखेमधुनी स्वप्नांचे नभात फिनिक्स उडावे देह मातीमध्ये जाताना मातीमधूनी उगवावे तू शतायुषी व्हावे, तू शतायुषी व्हावे......... उंच नभाला मुठीत आपुल्या अलगद पकडावे सुख दुःखांच्या लाटांवरती स्वार होऊन जगावे श्वास जरी संपत आले जीवनामध्ये हसत रहावे आयुष्याच्या संध्याकाळी स्वप्न उजेडाचे पहावे तू शतायुषी व्हावे, तू शतायुषी व्हावे............ दुःखांना टाळे ठोकूनी गाठा शिखर सुखाचे आनंदाची उधळा फुले ठेचूनं शूल काट्यांचे श्वास जितके शिल्लक जीवन तितके सजवावे जाता जाता मृत्यूलाही पुन्हा पुन्हा हरवावे तू शतायुषी व्हावे, तू शतायुषी व्हावे........... देहाचा क्षय होतांना मन मोर मनी नाचावा हृदयामध्ये वासंती हिरवा बहर फुटावा   सृष्टी जितकी सुंदर तितके जीवन सुंदर व्हावे मावळतीच्या या क्षणाला तू नभासारखे व्हावे तू शतायुषी व्हावे, तू शतायुषी व्हावे........